वासुदेव गो नाचनाचे..
जाग आली तांबड्याला, रंग दिला आभाळाला
गावाच्या गं वेशीवरी, साद घाली भोळा हरी
घुंगर बाजे घुंगर बाजे, वासुदेव गो नाचनाचे
आळसावलं वासरू रं, गोठ्यामंदी धडपडलं
भिजलं येडं पाखरू रं, घरट्यामंदी फ़डफ़डलं
पाण्यासाठी जाते माई, घट डोईवर तिच्या सजे
घुंगर बाजे घुंगर बाजे, वासुदेव गो नाचनाचे
ऊठ शिवा ऊठ हरी, घे तिफ़न तुझ्या करी
पाखरे ही भिरभिरी, निघाली बघ पिकावरी
काळी माती माय तुझी, पीक दाणे देव तुजे..
घुंगर बाजे घुंगर बाजे, वासुदेव गो नाचनाचे
वासुदेव ह्यो आला अंगणी, ऐक बोलते त्याची वाणी
ठेवी चित्त समाधानी, लक्ष्मी दारी भरेल पाणी
नकोस विसरू देवाला तू, ठेव मुखावर नाव त्याचे
घुंगर बाजे घुंगर बाजे, वासुदेव गो नाचनाचे
- प्राजु
(पूर्वप्रकाशन बीएमएम वृत्त जानेवरी २०११ )
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा