गोकुळीचा सखा हरी..
गोकुळीचा सखा हरी, राहतो दडून
दही दूध लोण्यासाठी, वाट अडवून
मोरपीस डोलते गं, मोहक मोहक
निळसर मोहनाचे, लाघवी हे रूप
जादूमयी खेळ बाई, गेले मी थकून!
गोकुळीचा सखा...
पावरीचा लावी सूर, मनी हूरहूर
गाई-गुरे गोकुळाचा, नादावला नूर
गारूड गं झाले असे, गेले हरवून
गोकुळीचा सखा..
रंग टाकूनिया कुठे, गेला गं हरीऽ
श्रीरंगाचा थर चढे, गोर्या कांतीवरी
सांगू कशी काय कुणा, पुसतील जन
गोकुळीचा सखा..
रास अशी रंगली गं, यमुनेच्या काठी
सोडविता सोडवेना, अंगभर मिठी
जाऊ कशी घरी , दिस गेला गं बुडून..
गोकुळीचा सखा..
- प्राजु
2 प्रतिसाद:
खूपच सुंदर !!!
अगदी 'कृष्ण आणि गोपिका'-दृश्य डोळ्यासमोर साकारले...
HI PRAJU KHUP CHAN AAHE TUZI SITE. NAVIN CD MALA MILALI
PRADNYA DATAR(NEHA)
टिप्पणी पोस्ट करा