अंगणातल्या रानावर..
अंगणातल्या रानावर, धुकं नाचून गेलं
पैजणीचे मोती वेडं.. , विसरून गेलं..
ओघळल्या मोत्यामध्ये, आकाशाचे बिंब
कोवळेसे किरणही, लाजेमध्ये चिंब..
सृष्टीच्या गं वेशीवरी, रथ भास्कराचा
झळकतो अंबरात, ध्वज सुवर्णाचा
हळूहळू वेढेल गं, भास्कराची मिठी
किलबील भूपाळीही, पाखरांच्या ओठी
एका धीट किरणाने, धाडस ते केलं
धुक्याच्या गं ओठावरी, चुंबुनिया गेलं
हरवलं वेडं खुळं, पाणी पाणी झालं
स्वत:च्याही नकळत, विरूनिया गेलं
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा