या वसंती..!
या वसंती पाकळ्यांना रंग तू देशील का?
चांदराती रातराणी होउनी फ़ुलशील का?
गारव्याची ही नशा गं पसरलेली चहूकडे
धुंद फ़ुंद ही गुलाबी मंद रातही बागडे
तारकांच्या रंगी माझ्या अंगणी रंगशील का?
चांदराती..
चांदवा हा मोहरूनी पाहतो प्रिये तुला
आणि हा निशिगंध वेडा बावरुनी उमलला
गंध माझ्या अंगणाला सांग तू देशिल का?
चांदराती ..
ओलावल्या ओठातूनी अमृताचे सूर यावे
हळूवार स्पंदनात प्रितीचे अंकूर यावे
प्रितीच्या त्या धुंद रानी, तू मला नेशिल का?
चांदराती..
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा