....तरी छंद मी पाळले गंधण्याचे
किती भास होती तुझ्या चांदण्यांचे,
किती यत्न करते तुला सांगण्याचे..
भिती वाटते त्या दिसाची मला की
पुन्हा क्षण येतील मी गुंतण्याचे
विसावे जरासेच वळणावरी या
पुढे क्षण ते आपुले पांगण्याचे
दिशांनी, ऋतूंनी मला शब्द दिधले
उगा आसवे ना कधी सांडण्याचे
कधी बोलले ना खुलूनी तुला मी
मला वेड होते तुला जिंकण्याचे
न प्राजक्त बहरून आला तुझा हा
तरी छंद मी पाळले गंधण्याचे
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा