नव्या ऋतूंची नवी दालने..
गूढ स्वरांचा ठसा आगळा
अलगद उमटे वार्यावरती
दहा दिशांतून पसरून बाहू
कोण मला हे खुणाविती??
स्वप्न वेगळे, ध्येय वेगळे
अज्ञाताच्या वाटेवरती
प्रकाशरेखा झळकत ऐसी
अंधाराची ना मज भीती..
पाचोळ्याशी सलगी होता
गाणे झुलते ओठावरती
अवीट होते वाट जराशी
विश्वची अवघे माझ्या हाती
घुमून येती दरी खोर्यांतून
सूर अवखळ साद घालती
पडसादांचे शब्द साजरे
फ़िरून पुन्हा मला सांगती
अवकाशी या आता मोकळ्या
हुंकार मनाचे ऐकू येती
नव्या ऋतूंची नवी दालने
फ़क्त माझ्या.. माझ्यासाठी!!
- प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा