बुधवार, २२ सप्टेंबर, २०१०

मी राधिका, मी प्रेमिका

गौर वर्ण माखला गं
जाहला निळा कसा..
त्या मिठीत सावळ्याच्या
जीव होई कृष्णपिसा

अंतरी या नाव त्याचे
भाव त्याचे, स्पंद त्याचे
दर्पणीही दिसे अताशा
सावळेसे बिंब त्याचे..

लागले गं वेड त्याचे
त्या ओठीची मी सानिका
ल्यायले श्रीरंग अवघा
मी राधिका, मी प्रेमिका..

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape