गाऊ कसे तराणे??..
जाते जळून जेव्हा, मम आसवांत गाणे
हातावरील मेंदी, का घालते उखाणे?
खिडकीत पावसाचा, का छंद भंगलेला
स्वरसाज बासरीचा, छेडी उदास गाणे
काळोख दाटलेला, पंखात जीव थोडा
क्षितिजास घोर आता, घरटे उभे मुक्याने
निश्वास टाकुनीया, ही सांज येत दारी
माझीच खूण मजला, ती सांगते नव्याने
शून्यात पाहताना, दिसते उगाच काही
डोळ्यात ओल आता, आली पुन्हा कशाने??
जन्मावरी कुणाचे हे कर्ज राहिलेले
हा प्राण विद्ध होता, गाऊ कसे तराणे??
- प्राजु
1 प्रतिसाद:
जाते जळून जेव्हा, मम आसवांत गाणे
हातावरील मेंदी, का घालते उखाणे?
matala jabardast..........
जन्मावरी कुणाचे हे कर्ज राहिलेले
हा प्राण विद्ध होता, गाऊ कसे तराणे??
kya baat hai......
टिप्पणी पोस्ट करा