आग्रहाचे आमंत्रण..
नमस्कार !
मी मराठीच्या सर्व रसिक वाचक, लेखक्, कवी, सुगरणी आणि बल्लवाचार्य मित्र्-मैत्रीणींना सांगताना मला खूप आनंद होतोय, की, माझ्या कविता 'फुलांची आर्जवे' च्या रूपाने रसिकांसमोर आल्यानंतर, त्यातल्या काही कविता आता गीत रूपाने अल्बम मधून तुमच्या समोर येत आहेत. माझ्या कवितांना, उत्तम चाली मध्ये बांधलं आहे संगीतकार अभिजीत राणे यांनी, आणि गायलं आहे वैशाली सामंत, बेला शेंडे, मधुरा दातार, संगिता चितळे, अमृता काळे आणि पौलमी पेठे यांनी.
एक स्वप्नं , जे उरी बाळगलं होतं.. ते आता प्रत्यक्षात येताना बघणे म्हणजे एक सोहळाच आहे. एक अपेक्षापूर्तीचा क्षण... एक खूप मोठा दिवस.. एक खूप मोठा प्रसंग.. आणि एक खूप मोठं पाऊल क्षितिजाच्या दिशेने! याचे साक्षीदार तुम्ही रसिक माय्-बाप.
मोठ्या मनाने, माझ्या बाळबोध कवितांना प्रगल्भ केलंत, अखंड मायेचा हात पाठीवर ठेवलात, नेहमीच उत्तमोत्तम लेखन माझ्याकडून व्हावं म्हणून प्रोत्साहन दिलंत.. तुमची नेहमीच ऋणी राहिन मी.
या माझ्या आनंदाच्या क्षणी, तुमची उपस्थिती असणं खूप गरजेचं आहे.. तुमच्या शिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शक्णार नाही. अपूर्णच राहील ही घडी !
नेहमीच माझ्या सोबत आलात.. माझ्या या क्षणांतही माझी साथ द्याल असा विश्वास आहे.
आपणा सर्वांना हे आग्रहाचे निमंत्रण.. माझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी मनापासून विनंती करते..
आपल्या सर्वांची वाट पाहीन कार्यक्रमाच्या ठिकाणी..
- प्राजु
अल्बम मधील काही गाण्यांची झलक आपल्याला येथे ऐकायला मिळेल.
कार्यक्रमाच्याठिकाणी अल्बम १०% सवलतीच्या दरात उपलब्ध राहील.
4 प्रतिसाद:
प्राजुताय हार्दिक अभिनंदन...
अभिनन्दन ! असेच नव नवे यशाचे मार्ग चोखाळा ।
प्राजक्ता,
दोन-तीन दिवसांपूर्वी सहज टीव्ही लावला तेव्हा "साम"वर मधुरामध्ये तुझी मुलाखत थोडीशी ऐकली. चेहऱ्यावरून मला वाटलंच की तू असशील आणि मुलाखतीच्या शेवटी ते कन्फ़र्म झालं तेव्हा खूप आनंद झाला.
तुझं मनापासून अभिनंदन.
नमस्कार,
मी.पा.ची जुनी पाने चाळत असताना मला २६ जुलै २००८ ईस्ट-कोस्ट मिपा कट्टा - न्यू जर्सी! हा अमेरिकेतल्या कट्ट्याची ओळख झाली. तुम्हा सर्वांनी हे कसे काय बुवा जमवले हो, लय भारी! आणि इकडे भारतात राहुन (जवळ जवळ असुन सुद्धा) बहुतेक वे़ळा सर्वांना जमतेच असे नाही. पण सगळे फोटो आणि विडिओ हे काढुन टकण्यात आले आहेत तेव्हा आपण ते मला माझ्या खाजगी विरोपी पत्त्यावर ( sopramod300@gmail.com ) पाठवाल काय? किंवा मला त्या फोटो चे पिकासाचा विरोपी पत्ता (लिन्क) द्यावी ही विनंती.
मला दयाघना हे गाणे पण ऐकायचं आहे. आणि आत्ता सभासद कुठे आहेत. ह्या सभासदांना मी.पा वर हजेरी लावता येत नाही आहे असे दिसते.
c.c. :- shree chaturang saheb.
thanks
टिप्पणी पोस्ट करा