अरसे महाल..
डोळ्यांत आसवांना जाळीत काल होता
उत्तर कधीच नव्हते ऐसा सवाल होता..
घालून हार कंठी, भाळी गुलाल होता
आक्रंद साहुनी तो, झाला हलाल होता
विकले कधी कुणाला, मजलाच ठाव नाही
स्वप्नेच दावणारा, तोही दलाल होता
मज सांगती कहाणी, ती भग्न मूक शिल्पे
श्रीमंत तो कधीचा, अरसे महाल होता
हृदयातल्या फ़ुलांचे आयुष्य वाळले अन
गंधीत तो बगीचा, झाला बकाल होता
नाजूक पापणीला ओझेच आठवांचे
नुसताच नीर वाहू डोळा हमाल होता
जिंकून हारताना, जखमाच फ़ार झाल्या
शापित जन्म हा पण, मृत्यू खुशाल होता!!
- प्राजु
1 प्रतिसाद:
बापरे........
टिप्पणी पोस्ट करा