स्पर्शून तारकांना ..
स्पर्शून तारकांना गाई पहाट वारा
कंपीत शब्द माझे आणि तुझा इशारा!!!
गंधात न्हात जाई , लाजून चूर होई
घेई उगा समेटुन, तो शुभ्रसा पिसारा
झंकारले अशी की, काया सतार झाली
तू छेडीले जरा अन, देहावरी शहारा
आली भरात आता, भलतीच प्रेम वेला
बेबंध श्वास माझे आणि तुझा उबारा..
स्पर्शात या तुझ्या रे, वर्षाव हा हिमाचा
पेटून तप्त होई, माझ्या उरी निखारा
दर्यास या मनीच्या, भलते उधाण आले
आवेग सोसवेना, सांभाळ तोल सारा
- प्राजु
2 प्रतिसाद:
वा मस्तच आहे...खरंच खूप छान....
छान लिहिता !
टिप्पणी पोस्ट करा