माझिया दर्पणा..
भेटले मी पुन्हा आज माझ्या मना
पाहिले मी तुला माझिया दर्पणा
बोलते का कुणी आजुबाजूस या?
चालली त्या तिथे राउळी प्रार्थना..
झाकल्या पापण्या आणि तुज पाहिले
सावळा श्रीहरी! ना उरे कामना..
लाभुदे या जगी जे हवे ते जना
ना मिळो दु:ख, ना वेदना, वासना
साद येई तुझी अंबरा भेदुनी
आस लागे मला रे तुझ्या दर्शना
भास होती मला का तुझे रोजचे
तूच तू ?, मीच मी?, की असे कल्पना?
दे असे बळ मला स्व:त्व हे राखण्या
वास्तवाशी घडे रोजला सामना
आजला जागले सूर जे आगळे
त्यात मी माझिया गुंफ़ल्या भावना
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा