मंगळवार, २ मार्च, २०१०

पुन्हा नव्याने..

स्मृतीपटलावर नाव कोरले ,पंचेंद्रियांनी तुझे नव्याने
महाभूतांच्या साक्षीने तुज, सर्वस्व दिले पुन्हा नव्याने

भरून येता आभाळ सारे, होते ओली चिंब नव्याने,
तुझ्या सयींच्या अमृतधारा, घेते हाती थेंब नव्याने..

तुझ्या सवे त्या अवकाशी मी, झंकारावे पुन्हा नव्याने,
प्रीत फ़ुलावी कणकणातून, साकारावे स्वप्न नव्याने..

लटके थोडे रूसावे आणि, तुझी आर्जवे पुन्हा नव्याने,
कधी पाकळ्या, कधी फ़ुले, काव्य नवे पुन्हा नव्याने..

गीत सुखाचे आळवताना, नवी सुरावट, छंद नव्याने,
हातामध्ये हात आणिक उरांत येती स्पंद नव्याने..

- प्राजु

5 प्रतिसाद:

क्रान्ति म्हणाले...

सुरेख!

Ashish म्हणाले...

Kharach khup chan.
Ashish Kulkarni

Ganesh Bhute म्हणाले...

सुंदर, आवडली...

Ganesh Bhute म्हणाले...

सुंदर, आवडली...

vidyadhar म्हणाले...

khup hriday sparshi, pramanikpane sangto ,janukahi majhyach vicharana konitari shabda dile ahet. Sundar, me harwoon gelo!

Page copy protected against web site content infringement by Copyscape