बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०

नशा तुझिया भासात..

रात सारी भिजून गेली
आठवणींच्या पावसात
किती सोडवू तरी सुटेना
मन गुंतले ध्यासात..

फ़िरून येती लाघव वेळा
भरून माझ्या ग्लासात
नसताना तू वेड लावते
नशा तुझिया भासात..

टिपूर चांदणवाट गुंतली
माझिया की प्रवासात
विरून गेले दरवळणार्‍या
आठवणींच्या सुवासात..

सदैव ऐकू येते काही
हृदयामधील न्यासात
भरती येऊन लहरींना
त्या उसळती उल्हासात..

मनी मानसी रूंजी घाली
पाखरू या विश्वासात
भरून येईल ओंजळ अवघी
तुझ्या माझ्या सहवासात..

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape