तुझ्या ऋतूंच्या साठवणी..
आठवणींनो विसावू द्या मज
जगतामध्ये या विखारी
स्वप्नांचे ढासळती इमले
करून जाती मला भिकारी
भिरभिरणार्या चाहुलींना
समजावू मी सांग कसे..
थरथरणार्या ओठांमध्ये
हसतानाही रडू दिसे
मोहोळ सारे उठवून अवघे
तडफ़डणारे पाखरू गं
दिशाहीन ही धडपड त्याची
उगाच पाही सावरू गं
कोसळणार्या आभाळाला
डोळ्यांमध्ये वाट मिळे
दुभंगलेल्या काळजामध्ये
इवलासा हा जीव जळे
मरण यातना देऊन जाती
येता जाता आठवणी
डंख मारूनी जखमी करती
तुझ्या ऋतूंच्या साठवणी
- प्राजु
2 प्रतिसाद:
sundar
dolyat ashru ale !
hrudaysparshi
टिप्पणी पोस्ट करा