या गूढ सावल्यांनी..
या गूढ सावल्यांनी सांज फ़ाकीत आहे
जणू चांदणे मला हे अजमावीत आहे
ते वाहता तराणे, स्वर कापराच त्याचा
वार्यास सय कुणाची, ही सतावीत आहे
ओढून पापण्यांचा पडदा अलगद थोडा
हळुच लोचनी या कोण डोकावीत आहे?
'होईल सर्व काही, जे आपणा हवे ते'
अंदाज हा तुझा की सांग भाकीत आहे?
अंधार हा विषारी, विळखा भयाण त्याचा
हातात ज्योत इवली, वाट दावीत आहे
हा श्वास कोंडताना, मजला कळून आले
कि आयुष्य दार माझे, ठोठावीत आहे
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा