शनिवार, १३ डिसेंबर, २००८

झोका..

झोका
गेला उंच वर, नाही थार्‍यावर
खाली झरझर, आला झोका..

अंगणी बांधला, झाडाले टांगला
मैत्रीने सांधला, एक झोका..

आंदोलने वेडी, निसर्गाची खोडी
मारावीशी दडी, घेत झोका..

झुले पाण्यावरी, होडी नी नावाडी
वल्ह असे मारी, देत झोका..

गुंजन करीतो, फ़ुलाशी रमतो
भवर हसतो, घेत झोका..

पाखरांचे गाणे, आभाळ दिवाणे
पाऊस बहाणे, देई झोका..

इंद्रधनुष्य ते, क्षितिजी रंगते
भुईला सांधते, देते झोका..

पाण्याचे तरंग, पाहूनिया दंग
माझे प्रतिबिंब, घेते झोका..

पिकावर जाई, बांधावर गाई
मन माझे घेई, पुन्हा झोका..

आशेचा हिंदोळा, दु:खाचा उमाळा
किती नाना कळा, दावी झोका..

जीवनाचा खेळ, गेला किती काळ
नाही त्याचा मेळ, असा झोका..

- प्राजु

2 प्रतिसाद:

Delight म्हणाले...

प्राजक्ता
नमस्कार, आपल्या ब्लाँगला भेट दिली व "झोका" कविता वाचली. आपली शैली फारच छान आहे. अभिनंदन.
शुभेच्छ्या.
दीपक ल. वाईकर
19/12/2008

Aani mi suddha! म्हणाले...

kavita chhan, apratim aahet.
shubhechha!

Page copy protected against web site content infringement by Copyscape