सोमवार, ८ डिसेंबर, २००८

ऋतू हिरवा..

पाहिले ना कोणी, ढगांच्या नयनी
साठलेले पाणी, बरसले..

झिरमिर धार, नाजूकशी गार
मातीचा हुंकार, गंधाळूनी..

ऋतू हा हिरवा, दिशांत गारवा
घुमतो पारवा, रानभर..

चुडा अवनीच्या, बहरत्या हाती
ओंजळीत मोती, उधळले..

संपली प्रतिक्षा, चातकाची शिक्षा
पावसाची भिक्षा, पदरात..

वेलींचे ही हात, झाडांच्या त्या गळा
पावसाच्या कळा, बहरल्या..

गारव्याचा छंद, वारा वाहे मंद
हिरवळी गंध, चराचरे

- प्राजु

1 प्रतिसाद:

Meenal म्हणाले...

संपली प्रतिक्षा, चातकाची शिक्षा
पावसाची भिक्षा, पदरात..
this should have been last as concluding.

Even first word of these lines shows `End`.

Page copy protected against web site content infringement by Copyscape