शुक्रवार, २४ ऑक्टोबर, २००८

नाही तर नाही....

नमस्कार मंडळी,खालील गझल मी मायबोली च्या गझल कार्यशाळेसाठी लिहिली होती. नाही रदिफ घेऊन लिहायची होती गझल. गझल लिहिण्यासाठी महत्प्रायास करावे लागले आणि अजूनही लागताहेत. ही गझल कार्यशाळेसाठी पाठवल्यावर तिच्यात १-२ बदल करून संयोजकांनी तिला निर्दोष गझल असे जाहीर केले आणि माझा जीव भांड्यात की मतल्यात पडला..खरंतर, गझलेच्या कार्यशाळेमध्ये भाग घेण्यापूर्वीही जवळ जवळ २ ते २.५ महिने मी गझल लिहिण्याचा अखंड प्रयत्न करत होते.. त्यासाठी माझे गुरू आणि गझलकार आणि निवृत्त विडंबन सम्राट केशव सुमार उर्फ अनिरूद्ध अभ्यंकर यांना भरपूर त्रास दिला आहे. त्यांची सहनशक्ती वाढली असल्याचे नुकतेच समजले आहे. मी माझ्या गुरूंची त्याबद्दल आभारी आहे आणि त्यांची सहनशक्ती अशीच दिवसेंदिवस वाढत राहुदे अशी त्या ईश्वराला प्रार्थना करते.तर हीच सो कॉल्ड गझल...


माझे मलाच पटले नाही
कोडे अजून सुटले नाही...

या आधी ना भेटलो कधी
कसे मला हे पटले नाही...

होकार तुझा मिळून गेला
'होय' जरी तू म्हटले नाही...

असंख्य झाले वाद तरीही
नाते अपुले तुटले नाही...

जीर्ण जाहली किनार त्याची
वस्त्र तरीही विटले नाही...

तुफान वारा भिडून गेला
तारू हे भरकटले नाही...

सोडुन तू गेलीस तरीही
प्रेम जराही घटले नाही...

- प्राजु

2 प्रतिसाद:

Kranti म्हणाले...

Hats off! yala mhantat gazal! khoop khoop surekh.

Himanshu Dabir म्हणाले...

शिणले हे शरीर तरीही
नेत्रपाकळी मिटली नाही...

sahaj lihavasa watla mhanun!
gazal chaan keli aahes!

Himanshu

Page copy protected against web site content infringement by Copyscape