Saturday, October 18, 2008

आठवांचा पसारा..

भुजंगप्रयातात ही कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे..

उगा जाहला आठवांचा पसारा
खळेना कशा आज डोळ्यांत धारा..

सुगंधी क्षणांना जपावे उराशी
उडू लागला गंध हा आज सारा..

असा ठेवला मोगरा मी जपूनी
सुकू लागला पाकळ्यांचा पिसारा..

जरी वादळी घेतली झेप मी ती
तुझ्या प्रीतिचा ना मिळाला निवारा..

जरी टाळतो मी तुझ्या आठवांना
तुला पाहता देहि येतो शहारा..

चला संपला अर्थ या जीवनाचा
दिला नीयतीने मला हा इशारा..

- प्राजु

1 प्रतिसाद:

Ganesh Bhute म्हणाले...

chhan, aavadali