सोमवार, ८ सप्टेंबर, २००८

मुक्ता..

त्या फुलांची आर्जवे मी टाळली नाही कधी
वेगळीशी वाट तीही टाळली नाही कधी..

गात होते गीत मी जे मानसीच्या मीलनी
तालसूरी गानरीती पाळली नाही कधी

लाख होते पाहणारे रूप माझे देखणे
स्वैर होती गर्विता ओशाळली नाही कधी

मोगर्‍याची बांधलेली माळ हाती नेहमी
ती फुले केसामधूनी माळली नाही कधी

वाचूदे ती प्रीत लोकांना जराशी आपुली
भाववेडी प्रेमपत्रे जाळली नाही कधी

वाहताना गार वारा ओढणीशी खेळला
नीटशी मीही तिला सांभाळली नाही कधी..

- प्राजु

1 प्रतिसाद:

Milind Phanse म्हणाले...

वा! सुंदर. कविता अत्यंत आवडली.
वाहताना गार वारा ओढणीशी खेळला
नीटशी मीही तिला सांभाळली नाही कधी..

क्या बात है!

Page copy protected against web site content infringement by Copyscape