थांब राजसा..
रात मधुमती, चांद संगती
थांब राजसा जाऊ नको..
स्पर्श अमृती, रे तुझी मिठी
दूर उभा तू राहू नको..
धरेस बिलगुन, गगन झोपले
गळा चांदण्-मणी गुंफले
दूधाळ होई , अकाश गंगा
क्षितिज माखले , जांभूळ रंगा
रंग मिलनी पुसटू नको..
थांब राजसा जाऊ नको..
रूणझुण वाजे पुन्हा पाऊल
नव्या उषेची नवी चाहूल
आर्त स्वरांनी रात पुकारे
मनी मिलनी, नवे धुमारे
स्वप्न टिपेला नऊ नको..
थांब राजसा जाऊ नको..
मिठीत ओल्या, मला राहु दे
मधुमिलनी, मला न्हाऊ दे
कुशित तुझा गंध घेऊ दे
उरांत तुझा छंद लेऊ दे
रात सुनी ही ठेऊ नको
थांब राजसा जाऊ नको..
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा