सत्यशिवाचे सुंदर मंदीर
सत्यशिवाचे सुंदर मंदीर वसुदे आमच्या
ठायी
मानवतेच्या देवा लाभो तुझ्यात आम्हा
आई..
जन्म फ़ाटक्या ठिगळांचा पण असाच अंत
नको
फ़ूलपाखरु व्हावे, पण कोषातील सुरवंट
नको
मने जुळावी आणि व्हावी अवघी दुनिया
स्नेही
सत्यशिवाचे सुंदर मंदीर वसुदे आमच्या
ठायी
भौतिकतेला विसरुन जावे करतो ही
प्रार्थना
संस्कारांतुन जीवन घडुदे, नको खुळ्या वासना
कोमलता अन भाव मधुरता आमच्या हृदयी
देई
सत्यशिवाचे सुंदर मंदीर वसुदे आमच्या
ठायी
- प्राजु
1 प्रतिसाद:
nice
टिप्पणी पोस्ट करा