सत्य शिवाहूनही सुंदर तू..
सत्य शिवाहूनही सुंदर तू
जल वायू अग्नी अंबर तू
तू प्रेरणा तू कामना
आशा मनी नवचेतना
दे ज्ञान तू, सन्मान तू
मज जीवनी दे भान तू
आधार तू निर्धार तू
मी गीत अन् गंधार तू
दे जाण तू जपण्या मनी
माणुसकी, संवेदना....
तू प्रेरणा तू कामना
आशा नवी नव चेतना....
झेपावण्या गगनावरी
तू धैर्य दे पंखांवरी
राहोत पाय जमिनीवरी
सार्या जगा जिंकू जरी
हृदयांतरी विश्वास दे
स्वप्ने नवी दे लोचना....
तू प्रेरणा तू कामना
आशा नवी नव चेतना....
-प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा