फ़ितूर पावसात या थरारते कशास तू (तरही)
फ़ितूर पावसात या थरारते कशास तू
निमंत्रणेच धाड सरळ कोवळ्या उन्हास तू
कधी इथे कधी तिथे कधी जवळ नि दूरही
मधेच मृगजळापरीच वाटतेस भास तू
गळून मी'पणा असा तुझ्या'पणात माखलो
बकूळ मी फ़ुलारला नि धुंदसा सुवास तू
घडी खुणावते जणू, फ़ुलून य मिठीत ये
ऋतू नवे बहर नवा, भरास मी भरास तू
जुई बकूळ मोगरा गुलाब सायली परी
न फ़ूल! त्या फ़ुलातल्या मधातली मिठास तू
झुबे नि वेल पैंजणे, गळ्यात सर नि बांगड्या
अनेक साज लेउनी छळू नको जिवास तू
परी कि अप्सरा म्हणू, गझल म्हणू की शायरी
मनातल्या मनात शब्द गुंफ़ला प्रयास तू..
-प्राजु
निमंत्रणेच धाड सरळ कोवळ्या उन्हास तू
कधी इथे कधी तिथे कधी जवळ नि दूरही
मधेच मृगजळापरीच वाटतेस भास तू
गळून मी'पणा असा तुझ्या'पणात माखलो
बकूळ मी फ़ुलारला नि धुंदसा सुवास तू
घडी खुणावते जणू, फ़ुलून य मिठीत ये
ऋतू नवे बहर नवा, भरास मी भरास तू
जुई बकूळ मोगरा गुलाब सायली परी
न फ़ूल! त्या फ़ुलातल्या मधातली मिठास तू
झुबे नि वेल पैंजणे, गळ्यात सर नि बांगड्या
अनेक साज लेउनी छळू नको जिवास तू
परी कि अप्सरा म्हणू, गझल म्हणू की शायरी
मनातल्या मनात शब्द गुंफ़ला प्रयास तू..
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा