मंगळवार, १७ एप्रिल, २०१२

आयुष्याशी मी खेळावे

ही गझल लिहीताना मजा आली.. अलामतीत सूट घेतली आहे.
तशी सूट घेऊ नये सहसा हे माहीत आहे. पण... काही काफ़िये घेताना तशी सूट घेण्याचा मोह आवरला नाही.

आयुष्याशी मी खेळावे
थोडे थोडे सांभाळावे

सौख्यामध्ये न्हातानाही
थोडे दु:खाला चोळावे

गोष्टी लेखाव्या प्रेमाच्या
त्याच्या नावाला गाळावे

नेत्यांची राखाया मर्जी
थोडे गोंडेही घोळावे

भाताचे खायाला उंडे
पिंडापाशी घोटाळावे!!

भांडूनी मी जन्माशी या
अंत:काळी गंधाळावे

माझ्या मर्जीने चालाया
रीतींना मी फ़ेटाळावे
----------------------------
काठाला हे तारू नेण्या
आवर्ताला कवटाळावे

-प्राजू

अलामतीत सूट न घेता.. पुन्हा एकदा..! मोह टाळला! :)

आयुष्याने चेकाळावे
थोडे थोडे सांभाळावे

सौख्यामध्ये न्हातानाही
थोडे दु:खला माळावे

गोष्टी लेखाव्या प्रेमाच्या
त्याच्या नावाला गाळावे

भाताचे खायाला उंडे
पिंडापाशी घोटाळावे!!

भांडूनी मी जन्माशी या
अंत:काळी गंधाळावे

माझ्या मर्जीने चालाया
रीतींना मी फ़ेटाळावे
----------------------------
काठाला हे तारू नेण्या
आवर्ताला कवटाळावे

-प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape