माझिया यौवना थांबना तू जरा..
माझिया यौवना थांबना तू जरा
मोकळा घे उरी, धुंद वारा जरा
श्रावणाचा नवा साज शृंगार तू
पावसाच्या गळ्यातील गंधार तू
तू हवा लाघवी, तू ऋतू साजरा
माझिया यौवना..
पाखरांच्या सवे तूही बेधुंद हो
डोलणार्या फ़ुलांतील तू गंध हो
तूच जाई-जुई, तूच हो मोगरा
माझिया यौवना..
हाय! स्वप्नी कुणी लाजवी सांगना
कोण छेडी तुझ्या लाजर्या स्पंदना
ऐक वेड्या! नको होउ तू बावरा
माझिया यौवना..
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा