सांग तुझिया लोचनातिल चांदण्याची कारणे
विटुन गेल्या जीवनाच्या रंगण्याची कारणे
काय होती वेदना आनंदण्याची कारणे!
मी तुला, अन तू मला! हे ठाव आहे पण तरी
गावती इतुकी कशी रे भांडण्याची कारणे?
वागणे भलते तुझे सार्या जगाच्या वेगळे
शोधिसी का जीव माझा टांगण्याची कारणे!!
एकमेका सोबतीने चालताना वाट ही
खास होती ती, मनेही गुंतण्याची कारणे
मांडलेला डाव अर्धा मोडुनी गेलास तू
शोधली ना मी पुन्हा त्या मांडण्याची कारणे
बोलले नाही कुणीही ना कुणी जोजावले
काय होती आसवांच्या सांडण्याची कारणे?
उजळले आकाश 'प्राजू', चांद नसताना तिथे
सांग तुझिया लोचनातिल चांदण्याची कारणे
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा