शनिवार, ४ डिसेंबर, २०१०

किती सोडवू तरी सुटेना प्राजू

किती सोडवू तरी सुटेना
प्रश्न ऐसा माझ्या पाठी
सांग मला रे इतकी सुंदर
का वाटे मज तुझी मिठी??

घुंगुरवाळा नाद भुलवी
शब्द साजरे तुझिया ओठी
फ़ूल जसे की निशिगंधाचे
कंच ओल्या हिरव्या देठी

लहरणारी फ़ुले प्रीतीची
फ़ुलून आली आपुल्यासाठी
रिक्त करावी ओंजळ अवघी
पुन्हा भरून घेण्यासाठी

अलगद घ्यावे स्वप्न टिपूनी
भिजल्या माझ्या नयनाकाठी
बघता बघता दारी आपुल्या
सुखे करतील दाटीवाटी..

-प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape