रविवार, ३० मार्च, २००८

सांज..


संधिकालचे गीत ओठी घेऊन सांज आली
अंबराला नवी किनार देऊन सांज आली..

घरांघरांतून पेटली ती चूल लिंपलेली
निरांजनाची ज्योत इवली लाऊन सांज आली..

गुरे वासरे आणि पाखरे घरी परतलेली
अस्ताचलाच्या झळाळीला बिलगून सांज आली..

संपला कोलाहल अन् चाहूल लोपलेली
उदास नूर त्या बाजाराला देऊन सांज आली..

पाऊलाला घरट्याची त्या ओढ लागलेली
वाटेवरती नजर कोणती लावून सांज आली..

तप्त चेतना, शुष्क ओठ अन् गात्रे थरारली
गूज रात्रीचे सांगत वेडी लाजून सांज आली..

- प्राजु

3 प्रतिसाद:

Unknown म्हणाले...

CHAAN

Unknown म्हणाले...

sahaj vachat gelo mab blogla bhet dilee. tumachya rachanaa khup sashakt aahet. manaalaa aanand detaat. satat lihit rahaa. maazyaa chotyaashaa shubhecha !

Atul म्हणाले...

व्वा! अस्सल ग्रामीण भागातली 'सांज' अगदी अशीच असते. कविता वाचताना ते वातावरण डोळ्यासमोर आले, तो वास नाकात दरवळला. शेवट तर अप्रतिम. मनातली ती गोड हुरहुरी शब्दाविना व्यक्त व्यक्त झाली आहे.

Page copy protected against web site content infringement by Copyscape