बुधवार, २६ मार्च, २००८

प्रभातीचे मिलन...

रविकर तो गोजिरवाणा,
झाला सौंदर्याने मोहीत,
धरेस त्या घेण्या कवेत,
लक्षलक्ष किरणे पसरित...

लाजलाजूनी धरा शहारे,
प्रातःसमयीचे ते रूप,
शितल भासे तेजोनिधी तो,
'वर' असावा अनुरूप..

प्रेमामध्ये चिंब भिजूनी,
साद घाली मिलनाला,
दवबिंदूंच्या अक्षता उधळीत,
धुकेही आले साक्षील...

शुभ्र धरीला आंतरपाठ,
किलबिल किलबिल सनई वाजे,
रंगबिरंगी नभोमंडपी,
कोकीळेची तान गाजे....

आंतरपाठ तो विरूनी गेला,
संसाराला गती आली,
ऊठ मुकुंदा ऊठ आता,
दुनियेला या जाग आली....

- प्राजु.

2 प्रतिसाद:

मोरपीस म्हणाले...

छान आहे

जयश्री म्हणाले...

व्वा.......मस्तच गं प्राजु..!!

Page copy protected against web site content infringement by Copyscape