अगदी नकळत!
वयाच्या तिसऱ्या
वर्षी ..
झोपेत असताना मायेने तळपाया वरून हात फिरवत..
“कित्ती नाचत असतं ग माझं पिलू..” म्हणत..
आजीने कौतुकाने पायात चाळवाळे घातलेले..
अगदी नकळत!
“कित्ती नाचत असतं ग माझं पिलू..” म्हणत..
आजीने कौतुकाने पायात चाळवाळे घातलेले..
अगदी नकळत!
सातव्या वर्षी..
सायकल शिकवताना..
बाबांनी अलगदपणे सायकलचा सोडलेला हात..
अगदी नकळत!
बाबांनी अलगदपणे सायकलचा सोडलेला हात..
अगदी नकळत!
लुटुपुटू च्या भांडणात..
दादाने नाकाला काढलेला चिमटा..
आणि मग रुसल्यावर घेतलेला गालगुच्चा..
अगदी नकळत ..!
आणि मग रुसल्यावर घेतलेला गालगुच्चा..
अगदी नकळत ..!
घट्ट पेडांची वेणी
घालत आईने
टोकाशी रीबिनीचे फुलपाखरू करून.. चेहऱ्यावरून हात ओवाळून
घेतलेली आलाबला... आणि कानामागे मोडलेली बोटे..
तीही अगदी नकळत!
टोकाशी रीबिनीचे फुलपाखरू करून.. चेहऱ्यावरून हात ओवाळून
घेतलेली आलाबला... आणि कानामागे मोडलेली बोटे..
तीही अगदी नकळत!
आणि मग
कुठल्याश्या नकळतश्या
पण भेकड अशा क्षणी..
नशिबाने बदलेला रस्ता.. घेतलेलं भयाण वळण..
आणि मग नुसती ओढाताण.. फरफट.. घुसमट
... कळत नकळतची !
नशिबाने बदलेला रस्ता.. घेतलेलं भयाण वळण..
आणि मग नुसती ओढाताण.. फरफट.. घुसमट
... कळत नकळतची !
नेमक काय कळत आणि
काय नकळत..!
चाळवाळ्याच्या जागी
खुळखुळणारा पैसा
पायावरून.. मांड्यांपर्यंत फिरणारे ओंगळ हात..
सायकल च्या जागी वस्त्रे विलग करणारे हात..
गालगुच्च्या च्या जागी.. चावे घेणारी मद्यधुंद तोंडे
वेणी ला रिबिनीच्या फुलपाखरा ऐवजी... लागणारा मादक गजरा..
सगळंच कस अगदी नकळत..!

आणि आता तर.. मेलेल्या शरीराला, जाणीवांना,
सरावलेल्या शहाऱ्यानाही.. काहीच कळत नाही..!
कोणी आलं काय, गेलं काय.. झोपलं काय..
कि शरीराशी खेळलं काय!
कि शरीराशी खेळलं काय!
सगळेच सोपस्कार कसे
व्यवस्थित पूर्ण होतात..
अगदी सगळ्यांच्याच नकळत.. !
अगदी सगळ्यांच्याच नकळत.. !
राजमार्गाने
चालणाऱ्या समाजाला सुद्धा
एका कोपऱ्यात लागतात असली यंत्रे..
एका कोपऱ्यात लागतात असली यंत्रे..
चालू अवस्थेतली... अगदी
नकळत!
- प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा