मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

थोडा प्रकाश दे तू , पाऊस दे जरा

थोडा प्रकाश दे तू , पाऊस दे जरा
आंदण म्हणून दे ना अंकूरण्या धरा
दाणे असे टपोरे, होणार मोह पण
गोफण फिरे जगाची सांभाळ पाखरा
होऊन बाष्प पाण्या उडशील उंच पण
गवसायचा तिथे ना शोधून आसरा
आला सख्या न सोबत, दिसला न चंद्रही
इतका नको उधाणू , हो शांत सागरा
नाते जरा मुरावे माझ्या तुझ्यातले
विश्वास प्रेम यांचा बांधून दादरा
तत्वे, विचार सवयी जुळल्यात आमच्या
शत्रूस मानले मी हृदयस्थ सोयरा
त्याच्या इथून वारा आलाय गंधुनी
'प्राजू' नको कुठेही शोधूस मोगरा
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape