गुरुवार, ५ नोव्हेंबर, २००९

पैलतीरी..

पुन्हा पुन्हा तू नको विचारू! प्रीत आपुली जन्मांतरी
सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतीरी..

इतुके ओझे अपेक्षांची खांद्यावरती असे भारी
किंचित हसूनी जगतानाही कळ उठते हृदयांतरी
थोडी होईल गती कमी पण नसेल काही जबाबदारी
सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतीरी..

किती संपले किती राहिले, हिशोब सारा यथातथा
मनांस वरले मनानेच मग काय कथा अन काय व्यथा?
तारूण्याची झिलई संपून जडेल प्रीती मनावरी
सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतीरी..

नको विचारू कधी, कुठे तू! प्रेमाने ही भर झोळी
जाऊ तरूनी संसारातून आणिक भेटू सायंकाळी
हात घेऊनी हातामध्ये,सांज आपुली करू साजिरी
सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतीरी..

- प्राजु

2 प्रतिसाद:

Shreeram म्हणाले...

प्राजु
हल्ली मला असे काय होतय? मला या कवितेतही माझे प्रतिबिंब दिसले. जसे तुझ्या मागच्या कवितेत दिसले होते. विशेषत: "सूर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होइल पैलतीरी" हे मला खूप हलवून गेलं. हसून जगताना हृदयांत कळही उठत होती. पण त्यावरही मात क्रायला शिकलोय. आपण कसे लहान मुलाला पोहायला शिकवताना पाण्यात फ़ेकून देतो. मग तो आपणच हात पाय मारत मारत शिकतो. तसे मी ह्या कळा सहन करायला शिकलो आहे. कळ अनुभवली, एंजॊय केली तर ती सहन होते हे अनुभवाला यायला लागलय. आणि पैलतीरीच्या भेटीच्यावेळी आपण अपेक्षांच्या ओझ्यापलीकडे गेलेले असतो.पैलतीरीची भेट आपल्या हातात नाही. पण तो पर्यंत तरी जबाबदारी नसली तरी तरी ती कळ सुसह्य करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत.
माझे मलाच प्रतिबिंब दिसतय ते असे.
प्राजु, तुझी कविता अफ़ाटच आहे. एकेका शब्दाची निवड तर इतकी चपखल अहे कि कविता वाचता वाचता तुम्ही ती अनुभवताही. खरच शब्द तर हात जोडून तुझ्यासमोर उभे अहेत की काय असे वाटावे.
आअणि प्राजु, हे सर्व छापील मत नाहिये बरे क्का.
अगदी मनापासून वाटले ते लिहीलय.
पप्पा

Chandrashekhar mahamuni म्हणाले...

apratim kavita keli aahes..!
mala kharech shabda suchat nahit..!

Page copy protected against web site content infringement by Copyscape