गुरुवार, २३ जुलै, २००९

हे घाव प्राक्तनाचे..

या गर्द नील नयनी, दाटून मेघ जमले
का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..?

चाहूल ही वसंती , कोकीळ ना कुठेही
रंगीत फ़ूल वेडे, गंधावरीच रुसले

मेंदी न रंगली ही, हे श्रावणास सांगा
पानेच वेचताना, काटे उगाच डसले..

शोधून सापडेना, मजला कुठे निवारा
अन वादळास मी ही, झोका म्हणून फसले

निर्माल्य जीवनाचे का ठेउ मी जपूनी
वठल्या मनांस माझ्या मी आज हेच पुसले

मज सांगतात सारे, विश्वास ठेव 'त्या'वर
त्यांना कसे न समजे, 'त्या'चेच दैव रूसले?

चुरगाळल्या मनावर, हे घाव प्राक्तनाचे
आरक्त भाव सारे, शब्दांमधून झरले

- प्राजु

5 प्रतिसाद:

Himanshu Dabir म्हणाले...

शोधून सापडेना, मजला कुठे निवारा
अन वादळास मी ही, झोका म्हणून फसले

वादळास... झोका This is really amazing!!
sagli kavita aawadli

der veli tuzi kavita mala surprise karte! kharach ashakya pratibha labhli aahe tula!

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

प्रतिभावान मुली....अत्युच्य प्रतिभावान गजल तुझी...कसे कौतुक करावे गं राणी....

खूपच सुंदर...

तुझी ताई...

Unknown म्हणाले...

nice poetry ! feeling like composing a song . . .

Unknown म्हणाले...

nice poetry ! feeling like composing a song on the same . . .

Aparna म्हणाले...

खूप छान गझल लिहिली आहेस प्राजु!!

Page copy protected against web site content infringement by Copyscape