मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

ओलेत्याने बसले असता

ओलेत्याने बसले असता कुठून आला रावा
गेला घेउन नकळत माझ्या ओठांवरती चावा
नदीकाठही शहारला अन थरथरले बघ पाणी
तुझ्या स्वरांनी झंकारत हा देहच झाला पावा
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape