वैराग घेतला का नुकत्यात चांदव्याने
अंधारले नभाचे अंगण असे कशाने
वैराग घेतला का नुकत्यात चांदव्याने
वैराग घेतला का नुकत्यात चांदव्याने
आवस नसे तरीही ना चांदण्या उगवल्या
ना मेघ पावसाचे, कोठे सरी न झरल्या
जाई जुई अबोली भेटावयास फुलल्या
आलेत काजव्यांचे लाखो दिवे थव्याने
अंधारले नभाचे अंगण तरी कशाने?
ना मेघ पावसाचे, कोठे सरी न झरल्या
जाई जुई अबोली भेटावयास फुलल्या
आलेत काजव्यांचे लाखो दिवे थव्याने
अंधारले नभाचे अंगण तरी कशाने?
घेऊन सांज गेली ओठात का विराणी
केली जमावबंदी क्षितिजावरी दिशांनी
खोळंबली उषा अन् डोळ्यात गर्द पाणी
झाली असाह्य धरणी आक्रंदते मुक्याने
अंधारले नभाचे अंगण पहा कशाने?
केली जमावबंदी क्षितिजावरी दिशांनी
खोळंबली उषा अन् डोळ्यात गर्द पाणी
झाली असाह्य धरणी आक्रंदते मुक्याने
अंधारले नभाचे अंगण पहा कशाने?
डोळ्यातल्या नभाचे फिटणार पारणे का?
संन्यस्त चांद त्याचा सोडील काय हेका?
उध्वस्त स्वप्न भवती त्याच्या असे फिरे का?
येतील चांदण्यांची केव्हा फुलून राने ?
अंधारले नभाचे अंगण पुन्हा कशाने?
- प्राजू
संन्यस्त चांद त्याचा सोडील काय हेका?
उध्वस्त स्वप्न भवती त्याच्या असे फिरे का?
येतील चांदण्यांची केव्हा फुलून राने ?
अंधारले नभाचे अंगण पुन्हा कशाने?
- प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा