वाट निघाली कुण्या आगळ्या गावा
दूर कुठे ही वाट निघाली कुण्या आगळ्या गावा
गुलमोहोराच्या उभ्या कमानी अन् वा-याचा पावा

खुळी पाखरे द्वाड गुरे जातात जिथे भटकाया
घेत धुक्याचे शुभ्र पुंजके नदी झाकते काया
उभा सळसळे पिंपळ आणिक पिवळा जर्द बहावा
दूर कुठे ही वाट निघाली कुण्या आगळ्या गावा
घेत धुक्याचे शुभ्र पुंजके नदी झाकते काया
उभा सळसळे पिंपळ आणिक पिवळा जर्द बहावा
दूर कुठे ही वाट निघाली कुण्या आगळ्या गावा
हात धरूनी ने मज सखया खुशाल त्या वाटेवर
बांधू घरटे फुलाफुलांचे बकुळीच्या झाडावर
दिवस अंथरू रात्र पांघरू घेऊ जरा विसावा
दूर कुठे ही वाट निघाली कुण्या आगळ्या गावा
बांधू घरटे फुलाफुलांचे बकुळीच्या झाडावर
दिवस अंथरू रात्र पांघरू घेऊ जरा विसावा
दूर कुठे ही वाट निघाली कुण्या आगळ्या गावा
नको कुणाची चाहुल तेथे नको राबता कुठला
तू माझा मी तुझीच व्हावे हिशोब सारा फिटला
नाव गाव चल सोडुन जाऊ नको कुठेच पुरावा
दूर कुठे ही वाट निघाली कुण्या आगळ्या गावा
तू माझा मी तुझीच व्हावे हिशोब सारा फिटला
नाव गाव चल सोडुन जाऊ नको कुठेच पुरावा
दूर कुठे ही वाट निघाली कुण्या आगळ्या गावा
-प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा