मिठी मारायला लाटा पहा येती किना-याला
मिठी मारायला लाटा पहा येती किना-याला
लपवते लाजुनी रेती उमटलेल्या शहा-याला
लपवते लाजुनी रेती उमटलेल्या शहा-याला
तुझे बेभान झाले मन जरासा घाल तू आवर
कुणी पोळावया घेतात का हाती निखा-याला?
कुणी पोळावया घेतात का हाती निखा-याला?
कशाला काळजी पडल्या छताची आणि भिंतींची
तिथे बघ पाखरू आलेय तुळईच्या निवा-याला
तिथे बघ पाखरू आलेय तुळईच्या निवा-याला
तुझ्या शब्दातली जादू तुझी स्वप्ने तुझ्या गोष्टी
मला गजलेत बांधुन आवरू दे या पसा-याला
मला गजलेत बांधुन आवरू दे या पसा-याला
"मिठी मागायची आहे धरेची , तू निखळ ना रे!"
म्हणे हे मागणे आकाश करते रोज ता-याला
म्हणे हे मागणे आकाश करते रोज ता-याला
सख्या जाणून आहे गंधही हृदयातला माझ्या
'नको वाहूस कोठेही!' कुणी सांगाल वा-याला?
'नको वाहूस कोठेही!' कुणी सांगाल वा-याला?
सरींची वाट बघण्यातच कदाचित जन्म हा जाइल
खुळ्या तू ऐक मनमोरा मिटव फुलल्या पिसा-याला
खुळ्या तू ऐक मनमोरा मिटव फुलल्या पिसा-याला
- प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा