ओलेत्या माझ्या देहावर
कधी लालसर कधी गुलाबी तुजवर माझा रंग चढावा
ओलेत्या माझ्या देहावर मत्त प्रीतीचा दरवळ व्हावा

गालावरती गुलबक्षाची नकळत माझ्या फुले चुरावी
ओठावरती केशर काडी नाजुकशी अलवार फिरावी
सोनसळी केसांतुन फिरण्या हात तुझाही सख्या झुरावा
ओलेत्या माझ्या देहावर मत्त प्रीतीचा दरवळ व्हावा
ओठावरती केशर काडी नाजुकशी अलवार फिरावी
सोनसळी केसांतुन फिरण्या हात तुझाही सख्या झुरावा
ओलेत्या माझ्या देहावर मत्त प्रीतीचा दरवळ व्हावा
सैलावत जाणारी व्हावी घट्ट मिठी मज कमरेभवती
उधाण व्हावी हृदय स्पंदने मनरंगाना यावी भरती
अंतरातला दरवळ माझ्या श्वासामध्ये तु्झ्या भिनावा
ओलेत्या माझ्या देहावर मत्त प्रीतीचा दरवळ व्हावा
उधाण व्हावी हृदय स्पंदने मनरंगाना यावी भरती
अंतरातला दरवळ माझ्या श्वासामध्ये तु्झ्या भिनावा
ओलेत्या माझ्या देहावर मत्त प्रीतीचा दरवळ व्हावा
गो-या वर्णावरती माझ्या छटा तुझ्या सावळ स्पर्शाची
इंद्रधनुष्ये खुलून यावी अंतरातल्या सतरंगांची
आणिक रात्रीवरती व्हावा धुंद चांदण्यांचा शिडकावा
ओलेत्या माझ्या देहावर मत्त प्रीतीचा दरवळ व्हावा
- प्राजू

0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा