तो ..बघतो त्याची नजर
तो ..बघतो त्याची नजर मनावर गारुड करते
अन्... हृदयावरती कितीक चित्रे नवी कोरते
अन्... हृदयावरती कितीक चित्रे नवी कोरते
तो... ओठांवरती ओठ ठेउनी लिहितो ओळी
अन् .. उमलत जाते विलग होउनी फूलपाकळी
अन् .. उमलत जाते विलग होउनी फूलपाकळी
तो... बोलत जातो शब्द शब्द शब्दातुन वचने
अन् .. हृदय अंगणी सडा घालती बकूळ सुमने
अन् .. हृदय अंगणी सडा घालती बकूळ सुमने
- प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा