फुलराणीसम फुलून यावे
फुलराणीसम फुलून यावे
हिरव्या नवथर गवतावरती
कुणीच ना पण भाळावे वा
कवन रचावे माझ्यावरती
हिरव्या नवथर गवतावरती
कुणीच ना पण भाळावे वा
कवन रचावे माझ्यावरती
लक्षलक्ष या स्वर्ण शलाका
प्रवास त्यांचा हा अवगामी
एक अनामिक अतर्क्य हिरवी
आतून माझ्या वाहे उर्मी
प्रवास त्यांचा हा अवगामी
एक अनामिक अतर्क्य हिरवी
आतून माझ्या वाहे उर्मी
वारा पाऊस ऊन होऊनी
अंश मनाचा जरी विखरतो
भुरभुरत्या सावरी परी मग
उडतो फिरतो अन् भिरभिरतो
अंश मनाचा जरी विखरतो
भुरभुरत्या सावरी परी मग
उडतो फिरतो अन् भिरभिरतो
कोंब कोवळ्या आनंदाचे
सजती लेऊनी रंग भाबडे
निष्पर्णाला चैतन्याचे
जणू वाटते असे वावडे
सजती लेऊनी रंग भाबडे
निष्पर्णाला चैतन्याचे
जणू वाटते असे वावडे
कुठे कुणाच्या हुंकारांनी
सळसळते पानांची दाटी
आयुष्याचे गीत अकल्पित
दरवळते या अधि-या ओठी
सळसळते पानांची दाटी
आयुष्याचे गीत अकल्पित
दरवळते या अधि-या ओठी
कशी मनाची अशी अवस्था
स्थैर्य म्हणू की म्हणू अधांतर
सौख्याशी ना नाते तोडत
ना दु:खाला देते अंतर
- प्राजू
स्थैर्य म्हणू की म्हणू अधांतर
सौख्याशी ना नाते तोडत
ना दु:खाला देते अंतर
- प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा