जुनेच प्रश्न का मनात घर करून राहिले?
जुनेच प्रश्न का मनात घर करून राहिले?
नवीन शोधण्यात उत्तरे दटून राहिले..
कशास थंड कोळशास घालसी हवा अशी
किती ऋतूत ते असेच धग झडून राहिले!
न उंबरा न पायरी, कधीच लाभली मला
हरी! शिवाशिवीत प्राण गुदमरून राहिले
किती अकांत मांडते कणाकणातुनी धरा
ढगा कसे तुझ्यात नीर साकळून राहिले??
दिशा न पाहिल्या कधी, न दीप शोधला कुठे
भयाण वादळात तारु भरकटून राहिले
मनातली जुनीच आस वांझ वाटते अता
कधीच स्वप्नबीज ना तिथे रुजून राहिले
हयात वेचली उणी तुझ्याच भोवती तरी
तुला न जाण, मी सदा इथे सडून राहिले
नवीन आस जन्मली, हळूच जाणलेस तू
गळ्यास घोटण्या नशीब धडपडून राहिले
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा