सांगना वागसी का मना वावगा
सांगना वागसी का मना वावगा
भावनाशून्य अन वाटसी कोडगा
ना कुणीही तुझे, ना कुणाचाच तू
मान एकांत हा सोयरा अन सगा
मी तयारीनिशी टाकले दान पण
ऐनवेळी दिला प्राक्तनाने दगा
सांत्वनाही नको आणि चुचकारही
जा चढव ना मना तू सुखाचा झगा!
कोरडे ठेवुनी जीवनाला असे
दाटसी का असा लोचनी तू ढगा?
तूच 'प्राजू' तुझ्या वागण्याला बदल
दूषणे देत जाऊ नको या जगा
-प्राजु
2 प्रतिसाद:
mast aahe
chhan kavita
टिप्पणी पोस्ट करा