का असे होतेय वारंवार हल्ली?
का असे होतेय वारंवार हल्ली?
दाटते आहे निराशा फार हल्ली
तू कसा घेशील माझ्या चाहुली रे
पैंजणे करतात ना झंकार हल्ली
मी जरा यादीच करते मागण्यांची
'तू' म्हणे देतोस ना होकार हल्ली?
नोट फेकुन काम कर म्हणती तयाला
देवही दिसतो अता लाचार हल्ली
दैनिकातुन जागरण व्हावे कशाने
लेखणीला ना कुणाच्या धार हल्ली
सौख्य बघ बोलावुनीही येत नाही
दु:ख ठोठावीत असते दार हल्ली
टाक ना 'प्राजू' जरा पाउल पुढे, का
वाटते घ्यावी अता माघार हल्ली??
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा