'त्या ढाण्या वाघाला..... लऊन मानाचा मुजरा...!"
मराठी मनाला जसे जाणले तू
जणू शिवधनुष्यास त्या पेलले तू
किती येथ आले नि इथलेच झाले
कसा काय नव्हता सवाली कुणीही?
महाराष्ट्र गेला तुडवला डिवचला
मराठीस नव्हताच वाली कुणीही
मराठीस जीवन तुझे अर्पिले तू
जणू शिवधनुष्यास त्या पेलले तू
तुझी हाक आली जणू जाग आली
तुझा केसरी रंग उदयास आला
निखारे तुझ्या बोलण्याने सुलगले
मराठी मताला नवा भाव आला
समाजातले व्यंगही जाणले तू
तरी शिवधनुष्यास त्या पेलले तू
भिनूनी असा राहिलेला मराठी
नसे कोणी येथे तुझ्या सारखा रे
असा एक नेताच की जगतजेता
महाराष्ट्र झाला पुन्हा पोरका रे
जणू लोपला हिंदवी धर्मसेतू
कसे शिवधनुष्यास त्या पेलले तू?
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा