तुझे म्हणून वागणेच व्यस्त वाटते मला
सदैव लोक घालतात गस्त वाटते मला
(तुला दुरून पाहणे प्रशस्त वाटते मला)
सुखात राहतेच मी, कुठेच दु:ख ना अता
स्वत:स हे बजावणेच मस्त वाटते मला
वरुन सर्व आलबेल, छान छान भासते
मनातल्या मनात मात्र ध्वस्त वाटते मला
म्हणायचे सदैव 'हो', कुणास ना दुखावणे
कसा नकार द्यायचा?? भिडस्त वाटते मला
हसून दु:ख साजरे, सुखात आसवे उभी
तुझे म्हणून वागणेच व्यस्त वाटते मला
इमेल धाडते कधी, मधेच फ़ोन लावते
उगाच पत्र-बित्र काय!... स्वस्त वाटते मला
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा