जन्म गेला उभा नाटका सारखा
हारलेल्या जणू नायका सारखा
जन्म गेला उभा नाटका सारखा
चार भिंतीत मी राहिलो नेहम
एक डबक्यातल्या बेडका सारखा
हो म्हणावे तुला की म्हणावे नको
वागतो मी असा लंबका सारखा
दास होउन तुझा राहिलो जीवना
वागुदेना मला मालका सारखा!
मेघ येथे कधी मेघ तेथे कधी
पावसा शोधतो चातका सारखा
जीव यांत्रीक झाला कधी ठाव ना
चालतो, बोलतो कोष्टका सारखा
पुण्ण्य आहे कुठे? ते कसे लाभते?
जन्मलो वाढलो पातका सारखा
गोजिरे साजिरे सौख्य आले तरी
त्यासवे वागलो खाटका सारखा
'रंगलेला दगड' हीच किंमत म्हणे!
ना कुणा वाटलो माणका सारखा!!
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा