ठेच लागुनी..
ठेच लागुनी जखमी तेव्हा झाले होते
पोकळ वचनांना मी जेव्हा भुलले होते..
फ़ुलताना मी विसरुन गेले यावेळीही
ग्रीष्माचे मी घाव कितिदा साहिले होते..
वाहुन गेल्यानंतर मला समजून आले
घरटे माझे शेणाचेच बांधले होते..
आजकाल मी आरशामध्ये पहात नाही
केव्हाच माझी ओळख मी विसरले होते..
तटावरती घेऊन जावे लाटांनी मज
आवर्ताला पुन्हा पुन्हा वीनवले होते..
मैफ़िलीत का डोळे त्यांचे भरून आले ?
दु:ख माझे सांगायचे मी टाळले होते!..
तुला भेटण्या आतुर मी रे, हे मृत्यो..!!
गरजेपुरते मी ही सारे जगले होते..
- प्राजु
3 प्रतिसाद:
कल्पना चांगल्या आहेत पण काही ठिकाणी लयीकडे आणि वृत्ताकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे म्हणताना अडखळायला होते आहे. तसेच, बहुतेक ओळींमध्ये २४ मात्रा आहेत पण खालील ओळींमध्ये संख्या वेगळी भरते :
दु:ख माझे सांगायचे मी टाळले होते! ->२५
तुला भेटण्या आतुर मी रे, हे मृत्यो..!! ->२२
अग्गं...काय लिहीतेस गं तू....किती कौतुक करावे बाई ह्या लेखणीचे...उमजेना आम्हाला...
खूपच सुंदर...
तुझी ताई
मैफ़िलीत का डोळे त्यांचे भरून आले ?
दु:ख माझे सांगायचे मी टाळले होते!..
...अप्रतिम
टिप्पणी पोस्ट करा