उषा..
हळद माखूनी अंगावरती
लोभसवाणी सोन शलाका
पाण्यावरती उतरूनी अलगद
तरंग उठवी हलका हलका
घेता भरूनी ओंजळ अवघी
साज रूपेरी पाण्यामधला
डोकावूनी तो पहात राही
चांद सावळ्या नभामधला
सांज विसावे आकाशाच्या
कुशीमध्ये लाजून थोडी
रक्तिमगाली खळी पडूनी
अवीट होई रात्र वेडी
टिपूर तारे साक्षीला अन
चंद्रकोरही गोजिरवाणी
रात-दिनाच्या संयोगातून
जन्मा येते उषा देखणी
- प्राजु
1 प्रतिसाद:
Khup mast lihile aahe. ekdum chaan.
टिप्पणी पोस्ट करा